Lockdown : मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? ‘या’ तारखेनंतर घेतला जाणार निर्णय    

Lockdown : मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? ‘या’ तारखेनंतर घेतला जाणार निर्णय    

लॉकडाऊन

मुंबईत सर्वसामान्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरु केल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला. मात्र, लोकल सुरु झाल्यामुळे गर्दी वाढली असून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये पूर्ण वेळ प्रवास करू देण्याबाबत आणि लॉकडाऊनबाबत निर्णय २१ व २२ फेब्रुवारीनंतर घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी सांगितले.

हवाई वाहतूकही वाढली

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सावधानतेचा इशारा देत लोकलमध्ये सर्वांना पूर्ण वेळा प्रवासाला मुभा इतक्यातच देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रुग्णांची संख्या वाढण्यामागे लोकल सुरु होणे हे एकमेव कारण आहे, असे सध्या तरी म्हणता येणार नाही, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. लोकलमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे अवघड आहे. परंतु, आता हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत्या, पण त्यांची संख्या वाढलेली आहे, असे सुरेश काकाणी म्हणाले.

दर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा

सध्या लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात चर्चा नाही. आम्ही दर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेत आहोत. २१-२२ फेब्रुवारीला पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका परिसरातील परिस्थिती विचारात घेण्यात येईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेता येईल, असे सुरेश काकाणी यांनी नमूद केले.

 

First Published on: February 15, 2021 10:54 PM
Exit mobile version