कालिदास नाट्यगृह व अंधेरी संकुलात सुविधा वाढविण्यासाठी २० कोटींची मागणी

कालिदास नाट्यगृह व अंधेरी संकुलात सुविधा वाढविण्यासाठी २० कोटींची मागणी

कालिदास नाट्यगृह व अंधेरी संकुलात सुविधा वाढविण्यासाठी २० कोटींची मागणी

मुंबई महापालिकेच्या अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात आणि मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह – संकुल या ठिकाणी सभासदांना व नागरिकांना अधिक चांगल्या सेवासुविधा बहाल करण्यासाठी येथील व्यवस्थापन पाहणाऱ्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान या न्यासाला मुंबई महापालिकेने २० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत व नगरसेविका राजुल पटेल यांनी केली आहे. मुलुंड ( प.) येथे पालिकेच्या मालकीचे कालिदास नाट्यगृह, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे. तसेच, अंधेरी (प.) येथे शहाजी राजे क्रीडा संकुल व क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे. या दोन्ही क्रीडा संकुलनांची देखभाल व व्यवस्थापन बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान या स्वतंत्र सार्वजनिक न्यासामार्फत करण्यात येते.

या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी महापौर तर उपाध्यक्ष पदी पालिका आयुक्त आहेत. मुंलुंड येथील क्रीडा संकुलनात बॅडमिंटन, टेबल टेनिस, जल तरण तलाव, योगा, कराटे अद्यावत व्यायामशाळा असून विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. तिरंदाजी, बास्केट बॉल आदी सुविधा नव्याने देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लग्नासाठी मैदान उपलब्ध करण्यात येते. कालिदास नाट्यगृहात मनोरंजन कार्यक्रम होतात. त्याचप्रमाणे, अंधेरी येथील शहाजी क्रीडा संकुलनात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कराटे प्रशिक्षण दिले जाते. येथे विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येतात. विविध समारंभ आयोजित करण्यात येतात.

येथे सदस्य शुल्क आकारून नागरिकांना पोहण्यासाठी व्यवस्था करण्यात येते. लग्न, समारंभ याचे भाडे जमा केले जाते. या दोन्ही क्रीडा संकुलनाची जबाबदारी व व्यवस्थापन बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान या न्यासामार्फत करण्यात येते. मात्र सध्या या दोन्ही क्रीडा संकुलनात काहीशी बिकट परिस्थिती असून काही ठिकाणी डागडुजी, सुधारणा करणे आणि काही नवीन सेवासुविधा बहाल करणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचार्यांना वेतन देणे आदी कामांसाठी किमान २० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याने पालिका प्रशासनाने हा निधी प्रतिष्ठानला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत व शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यावर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रशासनाने याची नोंद घ्यावी व कार्यवाही करावी, असे आदेश दिले.

First Published on: March 25, 2021 7:37 PM
Exit mobile version