नैराश्य आल्याने आपल्या मुलीचा खून करुन आईने संपवला स्वतःचा जीव!

नैराश्य आल्याने आपल्या मुलीचा खून करुन आईने संपवला स्वतःचा जीव!

प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात नैराश्याने त्रस्त असलेल्या ३० वर्षीय महिलेने आपल्या घरात एका अल्पवयीन मुलीची हत्या केली आणि त्यानंतर तिने स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक डीव्ही देशमुख यांनी सांगितले की, ही घटना बदलापूर शहरातील चिरगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. दरम्यान मुंबई पोलिसात काम करणार्‍या महिलेचा नवरा संध्याकाळी कर्तव्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्रीच्या जेवणानंतर, ती मुलगी सोबत बेडरूममध्ये झोपायला गेले होते. यावेळी तिची सासू आणि पुतणा हॉलमध्येच झोपले होते.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृ्त्तानुसार, महिला तिच्या मुलीसह बेडरूममध्ये झोपायला गेले असता, तिच्या सासूला बेडरूममधून ओरडण्याचा आवाज ऐकू आला, मात्र रूमचा दरवाजा आतून बंद केला होता. महिलेच्या सासूने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. यानंतर हा प्रकार समजताच काही शेजारी आले आणि त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता. ७ वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळली. या मुलीच्या मानेवर आणि पोटावर स्वयंपाकघरातील चाकूने अनेक वार झाले असल्याचे दिसले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला या चिमुकलीच्या जवळच मृतावस्थेत होती आणि तिच्या मानेवरदेखील काही जखम असल्याचे आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत ही महिला नैराश्यात असल्याचे निदर्शनास आले आणि म्हणूनच तिने आपल्या मुलीला संपवले, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपुर्ण घटनेची चौकशी केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.


 

First Published on: June 11, 2020 4:38 PM
Exit mobile version