विकास कामांना थांबवलं नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती दिली – मुख्यमंत्री

विकास कामांना थांबवलं नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती दिली – मुख्यमंत्री

‘मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ मुळे लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण आता कमी होणार आहे. कोरोनाच्या काळात अनेक काम ठप्प झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून पुन्हा एकदा कामांना गती मिळाली आहे. आज मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील. कारण कुठल्याही विकासकामांना थांबवलं नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देत जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत आहे’, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाण साधला आहे. मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

मुंबईचा विस्तार होतोय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘मुंबईचा विस्तार होत आहे. आजचा दिवस खूप खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण नुकतेच मी बेस्टच्या वडाळा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन केले. त्यांनंतर याठिकाणी आलो. आपण पाहिलं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन ठप्प झाली होती. त्यावेळी सर्व भार बेस्टवर होता. त्या काळातही सर्व प्रवाशांची सोय बेस्टकडून योग्य उपाययोजना करून करण्यात आली होती. त्यानंतर आज मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ चा अनावरण सोहळा पार पडला. त्यामुळे शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल पडले आहे.

कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरु होईल.

मेट्रोची खास वैशिष्ट्य

देशातील पहिली भारतीय बनावटीची मेट्रो आहे. ही मेट्रो चालकविरहीत असणार आहे. उर्जा वाचवण्यासाठी पुनरूत्पादन ब्रेक सिस्टम तसेच प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली अशी स्टेनलेस स्टील बॉडीची मेट्रो आहे. आणि खास बाब म्हणजे प्रवाशांना कोचमधून त्यांच्या सायकलसह प्रवास करता येणार आहे.

First Published on: January 29, 2021 9:26 PM
Exit mobile version