अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्ताचं नाव, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्ताचं नाव, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच वडील बुकी अनिल जससिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. अनिक्षाला उल्साहनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा राजकीय कट आहे की नाही? हे लवकरच कळेल, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. देवेंद्र फडणीस यांनी याबाबत विधानसभेत याबाबत या कहाणीचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली होती. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल जयसिंघानिया नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते. पोलिसांनी अनिल जयसिंघानिया यांच्या घरी पोहोचत त्यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. त्यानंतर आता अनिक्षा नावाच्या महिलेला मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगर येथून ताब्यात घेतले आहे.

विधिमंडळ परिसरात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. हा कोणता राजकीय कट आहे की नाही, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, असं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच या प्रकरणात अनिक्षाकडून खूप काही गोष्टी रेकॉर्डवर आल्या आहेत. यात मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्ताचं देखील नाव घेतल्याचा खुलासा देखील फडणवीसांनी केलाय. या प्रकरणात काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचीही नावं घेतली गेली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. सर्व गोष्टींचा खुलासा होईल. जेव्हा या प्रकरणात पुरावे समोर येतील तेव्हा मी नाव जरूर घेईल, असा इशारा देखील यावेळी फडणवीसांनी दिला.

First Published on: March 16, 2023 4:20 PM
Exit mobile version