CoronaVirus : धारावी चाललीय वरळीच्या पावलांवर

CoronaVirus : धारावी चाललीय वरळीच्या पावलांवर

वरळीत ज्याप्रकारे दिवसाला सरासरी ५० ते ७५ बाधित आढळले जायचे, तसेच आता धारावीत आढळून येवू लागलेत. गुरुवारी दिवसभरात धारावीत नवीन ५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८००च्या आसपास जावून पोहोचली. शेवटची आकडेवारीनुसार धारावीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७८३वर पोहोचले आहे.

धारावीत महापालिकेचे विशेष लक्ष केंद्रीत केले असून दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा फुगतच चालला आहे. मागील चार दिवसांच्या तुलनेत गुरुवारी आढळून येणारी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी असली तरी इतर वॉर्डाच्या तुलनेत ही संख्या अधिकच आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आणणे प्रशासनासाठी मोठे आव्हान असून त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या व्युहरचना विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली आखली जात आहे. संपूर्ण झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण हुडकून काढण्यासाठी लोकांना ताप, सर्दी तसेच खोकला असल्यास त्वरीत नजिकच्या क्वारंटाईन सेंटरमधील शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सामाजिक संस्था, मंडळ तसेच नगरसेवकांच्या मदतीने अशा लोकांची माहिती महापालिकेला देण्याचेही आवाहन केले जात आहे.

माहिम परिसर आता शंभरीच्या उंबरठ्यावर

जी-उत्तर विभागातील माहिम परिसरात पाच नवीन रुग्ण आढळून आले. गायवाडी पटेल चाळ, रेहमत मंझिल, सोनावाला अग्यारी लेन, पंकज चाळ, माहिम पोलिस वसाहत आदी ठिकाणी हे रुग्ण आढळून आले असून येथील एकूण रुग्णांची संख्या ९६वर पोहोचली आहे. त्या तुलनेत या विभागातील दादर परिसरात प्लाझा सिनेमा येथील  समाधान स्पिच, गोकुळधाम सोसायटी आदी ठिकाणी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दादरपरिसरातील एकूण रुग्णांची संख्चा ६६वर पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण जी-उत्तर विभागातील धारावी, माहिम व दादर परिसरांत ९४५ एवढी बाधित रुग्णांची संख्या झाली आहे.

First Published on: May 7, 2020 9:57 PM
Exit mobile version