जागतिक मधुमेह दिन – ८० टक्के मधुमेही रक्तातील साखरेच्या प्रमाणाबाबत अनभिज्ञ

जागतिक मधुमेह दिन – ८० टक्के मधुमेही रक्तातील साखरेच्या प्रमाणाबाबत अनभिज्ञ

शुगर लेवल वाढू लागल्यास मधुमेह रुग्णांमध्ये दिसू लागतात ही 5 लक्षणे,वेळीच सावध व्हा

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यातून होणाऱ्या आजारांचं प्रमाण ही वाढलं आहे. मुंबईतील एका सर्वेक्षणानुसार, तब्बल ७९.४ टक्के रुग्णांना रक्तातील साखरेची सामान्य पातळी किती असावी याबद्दलच माहिती नसल्याचे आढळून आले. हे सर्वेक्षण जून ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान करण्यात आली. मधुमेहींची संख्या ही बदलत्या जीवनशैलीने वाढत असून मधुमेहामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, धोके याबद्दल देखील या रुग्णांना पुरेशी माहिती नसल्याचेच चित्र समोर आले आहे. त्यामुळे त्या आजाराबाबत जागृती वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मधुमेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वेक्षणाच्या माहितीनुसार 

हे सर्वेक्षण एका खासगी क्लिनिकच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये एकूण १ हजार ६८३ रुग्णांचा समावेश असून यामध्ये ८९१ महिला तर, ७९२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांना गेल्या दोन वर्षापासून टाईप २ प्रकारचा मधुमेह असून त्यांचे वय हे १८ ते ७५ या वयोगटातील आहे. तर, ६५ टक्के मधुमेहींना मधुमेह म्हणजे नक्की काय याचीही माहिती नसल्याचे आढळून आले.

मधुमेहामुळे आरोग्यासंबंधी अनेक धोके निर्माण होत आहेत

याविषयी अधिक माहिती देताना मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदिप गाडगे यांनी सांगितले की, “सर्वेक्षणात ६५ टक्के रुग्णांना टाईप २ प्रकारच्या मधुमेहाबाबत माहितीच नव्हती. तसेच मधुमेहींच्या संख्येत वाढ होत असून या आजाराला सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. तर टाईप २ प्रकारच्या मधुमेहामुळे आरोग्यासंबंधी अनेक धोके निर्माण होत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून जागरूकता वाढवण्याची सध्या गरज आहे. जर मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहायचे असेल तर जनजागृती अत्यावश्यक आहे, असे डॉ. प्रदिप गाडगे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – धक्कादायक वास्तव उजेडात; आरोग्य उपकेंद्रात आदिवासी रुग्णांची हेळसांड


 

First Published on: November 13, 2019 10:49 PM
Exit mobile version