CSMT स्थानकात डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम

CSMT स्थानकात डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम

CSMT स्थानकात डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर नवीन, नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना (NINFRIS) अंतर्गत डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम (डिजीलॉकर्स) साठी कंत्राट दिले आहे.  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, या डिजी क्लॉकमुळे प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्याबाबत सुरक्षितता आणि सोयीची अधिक चांगली व्यवस्था होईल.परवानाधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉकर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे १५ ऑगस्टपासून कार्यान्वित करण्याच आले आहे. दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर स्थापित करणार आहे. सेवा शुल्कात कोणतीही वाढ केलेली नसून, २४ तासांसाठी प्रति बॅग रू. ३० आहे. प्रवासी सामानाच्या आकारानुसार लॉकर निवडू शकतात. ‘लॅडर 2 राइज प्रायव्हेट लिमिटेड’ प्रवाशांना मदत करण्यासाठी २४ तास परिचालन सहाय्य प्रदान करेल.

रेल्वेतील हा पहिलाच प्रकल्प

रेल्वेतील हा पहिलाच प्रकल्प आहे जो सुरक्षित लॉकर्स, डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅगचा वापर आणि ऑनलाइन पावती निर्मितीद्वारे सुधारित क्लॉकरूम सेवा प्रदान करण्यासह रेल्वेसाठी नॉन-फेअर महसूल उत्पन्न मिळवेल. वापरकर्त्यास युनिक बारकोडसह पावती मिळेल जी बॅग पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरली जाईल. पूर्णपणे स्वयंचलित मशीनसाठी प्रवाशांच्या प्रवासाचा तपशील आणि आरपीएफ कडून अनिवार्य स्कॅनिंग टॅग यासाठी आवश्यक असेल. ५ वर्षांच्या कालावधीत डिजिटल वैशिष्ट्यांसह या आधुनिक लॉकर्सच्या स्थापनेचा आणि संचालनाचा खर्च परवानाधारकाद्वारे पूर्णपणे केला जाईल. या स्थानकांवरील क्लॉकरूम ऑपरेशन्स देखील आउटसोर्स करून रेल्वेला ५ वर्षात ७९.६५ लाखांच्या नॉन-फेअर महसूल व्यतिरिक्त मनुष्यबळावरील खर्च वाचवण्यास मदत होईल.


हेही वाचा – IND vs ENG : एकाशी पंगा घ्याल, तर आम्ही सगळे उत्तर देऊ! राहुलची प्रतिस्पर्ध्यांना ताकीद-


 

First Published on: August 17, 2021 7:26 PM
Exit mobile version