दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मराठीतील सर्वोत्तम चित्रपट ठरलेला डोंबिवली फास्ट तसेच हिंदी दृश्यम, मदारी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन निशिकांतने केले आहे. प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे निशिकांत कामत यांना हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना काही काळापूर्वी Liver Cirrhosisचा त्रास होता. ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांना हा त्रास सतावू लागला.

‘डोंबिवली फास्ट’, या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शन शैलीची वेगळी छाप सोडणाऱ्या निशिकांत कामत यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटांवर आधारित चित्रपट साकारत ‘मुंबई मेरी जान’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सातच्या आत घरात आणि भावेश जोशी या चित्रपटातून त्यांचा अभिनय पाहता आला होता. तर, ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. २०२२ साली निशिकांतचा दरबदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणे अपेक्षित आहे.

हेही वाचा –

येवल्यातील डोंगरगावात काळवीटाची हत्या; आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता, एक ताब्यात  

First Published on: August 11, 2020 10:32 PM
Exit mobile version