नगराध्यक्षांकडून रेल्वे कर्मचार्‍यांना मास्क सॅनेटायझरचे वाटप

नगराध्यक्षांकडून रेल्वे कर्मचार्‍यांना मास्क सॅनेटायझरचे वाटप

सध्या पालघरमध्ये करोनाचा एकही बाधित रूग्ण नसला तरी सुरक्षिततेच्या कारणासाठी रेल्वे स्थानकावर काम करणार्‍या कमचार्‍यांना योग्य ती खबरदारी व काळजी घेणे गरजेच आहे म्हणून करोना विषाणूपासून सुरक्षित राहता यावे, या हेतूने पालघर नगरपरिषद नगराध्यक्ष डॉ उज्ज्वला काळे व पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार काळे ह्यानी जनतेशी सर्वात जास्त संपर्क येणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क हॅडग्लोज व सॅनेटायझरचे वाटप केले.

डॉ उज्जला काळे ह्यानी करोना व्हायरसपासून कशी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी ह्या विषयी मार्गदर्शन केले. सॅनेटाईजरने हात स्वछ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. घरीही आपण कशा प्रकारे सॅनेटायझर बनवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. त्या वेळेस पालघर स्टेशन मॅनेजर मिलींद किर्तीकर, बुकींग सुपरइंटेडन्ट खत्री, सेफ्टी काउन्सिलर रघुवीरसिंग राव, स्टेशन सुपरइंटेडन्ट परेश दादरकर, स्टेशन सुपरइंटेडन्ट संजय पाटील, परब हे आधीकारी व महिला सफाई कामगार आदी उपस्थित होत्या.

First Published on: March 19, 2020 3:11 AM
Exit mobile version