रिक्षा-टॅक्समध्ये बसण्यापूर्वी नंबर प्लेटचा फोटो काढून नातेवाईकांना पाठवा – रावते

रिक्षा-टॅक्समध्ये बसण्यापूर्वी नंबर प्लेटचा फोटो काढून नातेवाईकांना पाठवा – रावते

परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महिला अत्याचार, बलात्कार, छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भातच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिलांना एक खास सल्ला दिला आहे. टॅक्सी-रिक्षाने प्रवास करताना अनेकदा होणारी महिलांची छेडछाड, चालकांशी होणारे वाद, लुटमार, जादा भाडे आकारणीच्या घटना घडतात. हे लक्षात घेता प्रवाशांनी खासकरून महिलांनी टॅक्सी-रिक्षाच्या क्रमांकाचा फोटो काढून जवळच्या नातेवाईकांना मोबाईलवरून पाठवावा, असे आवाहन रावते यांनी केले आहे.

फोटो काढून नातेवाईकांना पाठवावा

टॅक्सी-रिक्षाने प्रवास करतना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांवेळी महिलांनी स्वत:हून कशी सुरक्षेची काळजी घ्यावी हे सांगितले आहे. सार्वजनिक वाहनात कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, बॅग-पर्स इत्यादी प्रकारचे साहित्य विसरल्यास संबंधित वाहनाची माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. तसेच दुर्दैवाने अपघात झाल्यास त्याचीही माहिती नातेवाईकांना लवकर मिळत नाही. अशा वेळी आपल्या प्रवासाची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तीस असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने त्याची मदत होऊ शकते. अशावेळी प्रवाशांनी रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वी त्याच्या नंबर प्लेटचा फोटो मोबाईलवरुन काढून तो आपल्या नातेवाईकांना किंवा मित्राला व्हॉट्सअॅपद्वारे किंवा इतर समाजमाध्यमांद्वारे पाठवावे, असे आव्हान रावते यांनी केले आहे.

रिक्षाचालकाचा परवाना रद्द

बीकेसीमध्ये एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडून अतिरिक्त भाडे आकारण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रवाशाने अतिरिक्त भाडे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दिवाकर रावते यांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेतली. या रिक्षाचालकावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. संबंधित रिक्षाचालकावर कारवाई करण्यात आली असून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही रावते यांनी दिले आहेत.

हेही वाचा – 

रिक्षाचालकांनो उद्धट वर्तन कराला तर खबरदार – दिवाकर रावते

First Published on: February 1, 2019 9:15 AM
Exit mobile version