१ ते २० नोव्हेंबर मुंबईतील शाळांमध्ये दिवाळी सुट्टी

१ ते २० नोव्हेंबर मुंबईतील शाळांमध्ये दिवाळी सुट्टी

कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरून वाद; शाळेच्या नव्या नियमावरून वादाला सुरुवात कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरून वाद; शाळेच्या नव्या नियमावरून वादाला सुरुवात

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेले दीड वर्षे बंद असलेल्या शाळांची ४ ऑक्टोबरला पुन्हा घंटा वाजली. तरीही कोरोनाचे सावट पूर्णपणे न गेल्यामुळे अनेक निर्बंध पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अवघ्या दहा दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परंतु मुंबईतील शाळांना अजूनही दिवाळीची सुट्टी जाहीर न झाल्यामुळे मुंबईतील विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. मात्र, आता मुंबईतील शाळांना दिवाळीची सुट्टी अखेर जाहीर झाली आहे. शिक्षक निरीक्षकांनी मुंबईतल्या शाळांना १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.

शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी २० ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक तसेच बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षकांकडे दिवाळी सुट्टी जाहीर करण्याबाबत निवेदन पाठविले होते. आज अखेर यासंदर्भातील आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्याने सुट्ट्याबाबतचा शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. कोरोना काळात अनेक शिक्षकही कोविड योद्धा म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाहीत. सुट्ट्या जाहीर न झाल्यामुळे यावर्षी देखील गावी जायला मिळेल की नाही, याबाबत अनेक शिक्षकही संभ्रमित होते.

First Published on: October 26, 2021 6:45 AM
Exit mobile version