लहान मुलांचा दहीहंडीच्या थरासाठी वापर करू नका; महिला व बालविकास मंत्र्यांची मागणी

लहान मुलांचा दहीहंडीच्या थरासाठी वापर करू नका; महिला व बालविकास मंत्र्यांची मागणी

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरु आहे. यात मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं या सणात मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करत आहेत. यानिमित्ताने राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका वेगळ्या दहिहंडीला हजेरी लावली. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांनी आज मुंबईतील डोंगरी भागात असणाऱ्या चिल्ड्रेन्स अँड सोसायटी बालसुधार गृहातील बच्चे कंपनीसोबत दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी गोविंदा पथकांना लहान – लहान मुलांचा दहिहंडीचे थर लावण्यासाठी वापर करू नका असे आवाहन केले आहे. तसेच सणांवरूनही त्यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

यापूर्वीच्या सरकाराने हिंदु सणांवर बंदी शिवाय काय केलय? आताच शिंदे फडणवीस सरकार काय काय करतय यातला फरक बघा, असा टोला मंत्री लोढा यांचा ठाकरे सरकारलाही लगावला आहे. महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत अनोळखी दहीहंडीचं आयोजन करण्याचे आले होते.


मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील ‘राणा’चं निधन; पोटाच्या विकाराने होता त्रस्त

First Published on: August 19, 2022 1:46 PM
Exit mobile version