कोरोना लस : मानवी चाचणीसाठी डॉक्टर रेड्डीजचा डीजीसीआयकडे अर्ज

कोरोना लस : मानवी चाचणीसाठी डॉक्टर रेड्डीजचा डीजीसीआयकडे अर्ज

डॉक्टर रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीजीसीआय) स्पुतनिक तिसऱ्या टप्प्यातील मानवी क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे. रशियाच्या सॉवरेन वेल्थ फंडने क्लिनिकल चाचण्यांसाठी तसेच प्रायोगिक लसीच्या वितरणासाठी हैदराबाद येथील फार्मास्युटिकल फर्मसोबत करार केला आहे. याआधीच ऑगस्टमध्ये रशियन सरकारने या गोष्टींसाठी मान्यता दिली आहे.

डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांने डीजीसीआयकडे अर्ज करत, रशियाने विकसित केलेल्या कोविड -१९ स्पुतनिक लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी मागितली होती. या अर्जाला मंजुरी देण्यापूर्वी डीसीजीआय तांत्रिक मूल्यांकन करेल अशी अपेक्षा आहे. गेमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी विकसित केलेल्या स्पुतनिक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ४० हजार जणांवर हा प्रयोग करण्यात येत आहे.

संशोधनातील विविध पद्धतींचा अवलंब या अभ्यासात करण्यात आला आहे. आरडीआयएफने पूर्वी सांगितले होते की भारतात नियामक मान्यता मिळाल्यानंतर ते लसीचे १०० दशलक्ष डोस भारतीय फार्मा कंपनीला पुरवतील. रशियात लस विकसित करण्याचा आतापर्यंत चांगला इतिहास आहे. आतापर्यंत रशियाने ७६ रूग्णांचा अभ्यास प्रकाशित केला आहे. द लॅंसेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार चांगल्या अॅंटीबॉडी तयार होण्यासाठी या लशींचा उपयोग होतो आहे.


 

First Published on: October 3, 2020 4:20 PM
Exit mobile version