डॉक्टरांची जनजागृती; ‘वोट फॉर हेल्दी नेशन’चं आवाहन

डॉक्टरांची जनजागृती; ‘वोट फॉर हेल्दी नेशन’चं आवाहन

प्रातिनिधिक फोटो

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण, आजही निवडणूक आणि मतदान याविषयी तितकीशी जनजागृती नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी दिलेली सुट्टी लोक मतदान न करता घरीच घालवतात. त्यात तरुण वर्ग ही मतदानासाठी पुढे येत नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील डॉक्टरांनी पुढाकार घेत मतदार राजाला मतदान करण्याचं आवाहन करणार आहे.

डॉक्टर नोट

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. जसे रूग्णाला औषधोपचार आवश्यक आहे तसेच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.
– डॉ. रॉय पाटणकर, संचालक, झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

चेंबूरच्या झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मतदान

डॉक्टरांकडून ही जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरीकांना मतदानाचे आवाहन करणार आहे. २२ एप्रिलपासून या मोहिमेला सुरूवात होणार असून ‘सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा’ हा संदेश प्रिस्क्रिप्शनच्या चिठ्ठीवर लिहित अनोखी मोहिम राबवत प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाचं महत्व सांगणारे संदेश, डॉक्टरांचे मतदानाविषयी आवाहन करणारे व्हिडीओ जास्तीतजास्त नागरिकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

First Published on: April 21, 2019 7:17 PM
Exit mobile version