कुत्र्या, माणसाची अनोखी दोस्ती

कुत्र्या, माणसाची अनोखी दोस्ती

ठाणे:-स्थळ: मासुंदा तलाव ,ठाणे पश्चिम. तलावाच्या कठड्यावर एकाच ठिकाणी २६ वर्षे मॉलिशचा व्यवसाय करणारे, गोविंद राम आहुजा हे सध्या ठाण्यात चर्चेचा विषय आहेत. ते त्यांच्या मॉलिशमुळे नव्हेतर त्यांना जवळ केलेल्या कुत्र्यांमुळे. आहुजा यांनी जवळ केलेला कुत्रा, ते दुपारीच्या वेळी विश्रांती घेत असताना त्यांच्या साहित्याची देखरेख करतो. कोणाची हिंमत की तो त्यांच्या साहित्याला हात लावेल, जरा जरी पुढे झाले तरी तो कुत्रा त्याच्या अंगावर येतात.

गोविंद आहुजा यांनी मासुंदा तलावाजवळ सुरुवातीला अनेक व्यवसाय केले. कधी वजन काटा, कधी नकली दागिने विकताना आहुजा तेथील भटक्या कुत्र्यांना अन्नपाणी देऊ लागले. त्यातून या कुत्र्यांसोबत आहुजांची घनिष्ठ मैत्री झाली. आहुजा सांगतात, ठाणे स्टेशन ते जांभळी नाका असा ब्रिज बनत होता, तेव्हा एक कुत्री तेथे आश्रयास आली ती आक्रमक स्वभावाची असल्याने तिचे नाव त्यांनी शेरणी असे ठेवले होते. शेरणीचा कालांतराने मृत्यू झाल्यानंतर ही तिचे पिल्लू आहुजांच्या मित्र यादीत दाखल झाले. त्याचे नाव आहुजांनी लालू ठेवले.

आहुजा हे दुपारच्या वेळेस निवांत झोपले असले तरी हे इमानी कुत्रे आपल्या अन्नदात्याच्या मालाची कोणी चोरी करू नये त्यांच्या धंद्याला पहारा देत असते. आता गोविंदराम यांचा मुलगा रवी अहुजा याचाही या कुत्र्यांना लळा लागला आहे. कालू,लालू,राणी अशी विविध नावे ठेवलेले भटके कुत्रे, तलावाजवळ दुपार नंतर धंदा लावला की, अगदी प्रेमाने त्यांच्याजवळ येत असतात. आहुजाही या कुत्र्यांच्या खाण्यापिण्याची सोय नित्यनियमाने करतात.

अमित मार्कंडे
First Published on: October 29, 2018 12:47 AM
Exit mobile version