Arun Gawli: डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकोर्टाचे आदेश

Arun Gawli: डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकोर्टाचे आदेश

डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकोर्टाचे आदेश

नागपूर: गँगस्टर अरुण गवळीची सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. (Don Arun Gawli to be released from jail Orders of the High Court)

2006 च्या शासन निर्णयाद्वारे डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर आता निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळींची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2006 चं महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक काय आहे? Maharashtra government circular of 2006

कमलाकर जामसांडेकर हत्या

2 मार्च 2007 चा दिवस. संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते. मुंबईतील घाटकोपरमधील मोहिली व्हिलजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर दिवसभरातले कामं संपवून संध्याकाळी घरी टीव्ही पाहत बसले होते. असल्फा व्हिलेजमधईल रुमानी मंझीलच्या चाळीत ते राहत. तेव्हा काही शुटर्सने त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती.

प्रकरण काय होतं?

कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरून वाद सुरू होती. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. त्यासाठी नवे शुटर्स शोधण्यात आले. दोघांना अडीच अडीच लाख देण्याचं कबूल करत, 15 दिवस जामसंडेकर यांच्यावर पाळत ठेवत त्यांची हत्या करण्यात आली. याच हत्येप्रकरणी गवळी सध्या तुरुंगात आहे.

First Published on: April 5, 2024 1:30 PM
Exit mobile version