मुंबई वाहतूक पोलिसांचे ‘मिशन इम्पॉसिबल’!

मुंबई वाहतूक पोलिसांचे ‘मिशन इम्पॉसिबल’!

प्रातिनिधिक फोटो

वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस नेहमी आपल्या ट्विटर हँडलवरून संदेश देतात. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओद्वारे आवाहन किंवा कार्टून्सच्या माध्यमातून ट्विट केलं जातं. मात्र, आता ‘मिशन इम्पॉसिबल’ या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा सहावा भाग ‘मिशन इम्पॉसिबल – फॉलआऊट’ या चित्रपटातील व्हिडिओ वापरून रस्ते सुरक्षेबाबत संदेश दिला. या ट्विटवर लोकांचे भरभरून प्रतिसाद मिळाले. काही लोकांनी याचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी यावरून वाहतूक पोलिसांनाच ट्रोल केले आहे.

या व्हिडिओत चित्रपटाचा हिरो टॉम क्रूझ विनाहेल्मेट बाईक चालवतो असतो. दुसऱ्या क्षणी त्याच्या गाडीचा अपघात होऊन तो रस्त्यावर पडतो. ‘अशाच प्रकारे जर तुम्ही बाईक चालवत रहिलात तर तुम्हाला दंडित करणे आमच्यासाठी मिशन इम्पॉसिबल होणार आहे’ असा संदेश त्यांनी व्हिडिओखाली लिहिला आहे.

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

वाहतूक पोलिसांनी केलेल्या ट्विटबद्दल काही जणांनी त्यांचे कौतुक केले आहे. मात्र काही लोकांनी वाहतूक पोलिसांवर कमेंटच्या माध्यमातून टीका केली. ‘आम्ही अशा पद्धतीने गाडी चालवत नाही. मात्र खड्ड्यामुळे हे मिशन इम्पॉसिबल बनले आहे’, अशी प्रतिक्रिया काही नेटिझन्सनी दिली आहे.

 

First Published on: July 30, 2018 8:38 PM
Exit mobile version