बाळासाहेबांच्या पुतळ्याला दक्षिण मुंबईतून विरोध

बाळासाहेबांच्या पुतळ्याला दक्षिण मुंबईतून विरोध

बाळासाहेबांच्या पुतळ्याला दक्षिण मुंबईतून विरोध

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावकरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्याच आला आहे. दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यास दक्षिण मुंबईतून विरोध केला जात आहे. दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारु नये, अशी दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी

फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स या संघटनेने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शिखर संघटनेत ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्ट या संघटनेचा समावेश आहे. तसेच ज्या ठिकाणावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला जाणार आहे, ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

तसेच या ठिकाणाहून गेट वे ऑफ इंडियाकडे जाण्याचा मार्ग असल्याने इथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात उद्भवते. त्यामुळे या सर्व कारणांमुळे पुतळा नियोजित ठिकाणी उभारु नये, असे पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – मुंबईमध्ये डिटेंशन कॅम्प? उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा आणखी एक निर्णय बदलला


First Published on: December 24, 2019 2:47 PM
Exit mobile version