शताब्दी हॉस्पिटलात उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा

शताब्दी हॉस्पिटलात उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा

कांदिवली पश्चिमेला एस.व्ही. रोडलगत असलेल्या शताब्दी हॉस्पिटलच्या प्रांगणात मोठ्या गोल चबुतर्‍यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच या हॉस्पिटलचे नावही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा बसवण्याचे काम हाती घेतले असून याकरता स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांचे विशेष योगदान लाभले आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती गौतम पांडागळे यांनी दिली.

बारा फूट उंच आणि सुमारे १ हजार ९०० किलो वजनाचा पंचधातू मिश्रीत असा हा पुतळा असणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचारणे यांनी हा पुतळा साकाराला असून तब्बल १८ लाख रूपय इतका या पुतळ्यासाठी खर्च झाला आहे. शताब्दी हॉस्पिटल हे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणार आहे. हॉस्पिटलात येणारे रुग्णांचे नातेवाईक परिसरातील लोन वर बसून उघड्यावर जेवण करत असतात मात्र आता पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणची जागा सुशोभित करून तो नातलगांच्या विश्रांतीसाठी देण्यात येणार आहे.

दादर येथील इंदू मिल परिसरात डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार आहे, पण तिथून पुढे बोरिवलीपर्यंत डॉ. आंबेडकर यांचा एकही पुतळा नाही. याबाबत जनमानसात नाराजीचा सूूर होता. पण स्थानिक खासदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे रुग्णालयाचे नाकरण होतांना त्याठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा असावा, असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला. तो प्रस्ताव मी त्वरित स्वीकारला. भारतभर मी साकारलेली राष्ट्रपुुरुषांचे पुतळे ठिकठिकाणी उभारण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकर यांनी दलित, पददलितांचा उद्धार करण्यासाठी स्वत:चे आयुष्य खर्च ेकेले.
उत्तम पाचारणे, ज्येष्ठ शिल्पकार

हॉस्पिटलच्या वास्तूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव महापालिका सभागृहात मान्य करण्यात आला. त्यामुळे हॉस्पिटल व त्या परिसराची शोभा वाढणार आहे.
– डॉ. आंग्रे, अधिष्ठाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल

-संदीप टक्के

First Published on: November 19, 2018 5:40 AM
Exit mobile version