बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तूमध्ये त्यांचे संग्रहालय करा – मिलिंद देवरा

बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तूमध्ये त्यांचे संग्रहालय करा – मिलिंद देवरा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मिस जिओरजिया गाऊल्ड यांना पत्र लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तूमध्ये त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. येत्या २४ सप्टेंबर २०१९ रोजी कॅमडेनच्या स्वतंत्र नियोजन चौकशी समितीसमोर महाराष्ट्र सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूचे जतन करून तेथे संग्रहालय व्हावे, याबाबत आपली बाजू मांडणार आहे. कॅमडेन परिषदेने ही निवासी मालमत्ता असल्या कारणाने तिथे संग्रहालय उभारण्याची मागणी फेटाळलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. तसेच ते सामाजिक न्याय व्यवस्थेसाठी लढण्यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी जात पात, धर्म, लिंग याबाबतीत कधीही भेदभाव मानला नाही आणि या विरोधात कायम लढा दिलेला आहे. संपूर्ण जगातील राजकीय स्पेक्ट्रम मध्ये त्यांना मान सन्मान आहे. विरोधी पक्ष पण त्यांचा आदर करायचे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिली.

काय म्हणाले मिलिंद देवरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १० किंग हेनरी रोड, नॉर्थवेस्ट लंडन मधील जी वास्तू जिथे ते लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स १९२१-१९२२ या कालावधीत शिकत असताना राहत होते. मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सदस्य असून भारताच्या प्रमुख विरोधी पक्षात असून ही मी भाजप सरकारच्या सोबत आपणास मागणी करतो की आवश्यक त्या परवानग्या देऊन लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूत संग्रहालय करण्यास परवानगी द्यावी. जर हे संग्रहालय झाले तर विद्यार्थ्यांना तसेच भविष्यातील पुढच्या पिढीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी आणि जात पात व धर्मव्यवस्थेविरोधातील लढ्याविषयी माहिती मिळेल. तसेच कॅमडेनच्या पर्यटनाला ही चांगली चालना मिळेल, असे मिलिंद देवरा यांनी पत्रात नमूद केलेले आहे.

First Published on: August 23, 2019 2:35 PM
Exit mobile version