उल्हासनगरमध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र

उल्हासनगरमध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र

बैठक

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एमपीएससी आणि युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यास आणि ही परिक्षा देण्यास वंचित राहणाऱ्या मागासवर्गीय (एससी) विद्यार्थ्यांना शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र उभारण्यास हिरवा कंदील दिला असून त्यासाठी २४ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आज उल्हासनगर पालिकेत विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बालाजी किणीकर यांनी ही माहिती दिली.

उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशरप्रमुख दिलीप गायकवाड यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचे आभार मानले. हे केंद्र कॅम्प नंबर ५ मध्ये असलेल्या समाजकल्याण विभागाच्या जागेवर उभारण्यात येणार आहे. यासोबतच अपंग कल्याण विभागाच्या शासकीय प्रौढ व मुकबधिर प्रशिक्षण केंद्राचा देखील विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पुणे येथे पहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र असून दुसरे उल्हासनगरात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय (एससी) विद्यार्थ्यांचे आयएएस-आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे डॉ. किणिकर यांनी सांगितले.

First Published on: July 8, 2019 7:46 PM
Exit mobile version