डॉ. पायल तडवी प्रकरण: तीनही महिला आरोपींना १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. पायल तडवी प्रकरण: तीनही महिला आरोपींना १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. पायल तडवी

पायलच्या कुटुंबियांकडून वकील राजा ठाकरे यांच्याकडून आज सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट मिळाली नाहीये. तीनही आरोपी शिकवल्यासारखे एकसारखेच बोलत आहेत. आरोपी तपासात जराही मदत करत नसल्याचा दावा क्राईम ब्रांचने कोर्टात केला. त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

आरोपींच्या समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कस्टडी आवश्यक आहे. घटना घडली त्यादिवशी पायल आरोपींच्या सोबत होती. मात्र दुपारनंतर ही घटना घडली. यादरम्यान नक्की काय झालं? हे शोधण्याची आवश्यकता असल्याचे क्राईम ब्रांच कोर्टात सांगितले.

पायल तडवी प्रकरणातली साक्षीदार स्नेहल शिंदे हिने आरोपींच्या विरधात साक्ष दिलीय. स्नेहल शिंदे ही पायलची सहकारी होती, तिच्यासमोर पायलला जातीवाचक कमेंट करण्यात आली, असा वकील राजा ठाकरे यांचा युक्तिवाद आहे.

डॉ . हेमा अहुजा पायल ताडवी हीला तू मागासवर्गीय कोट्यातून आली आहेस, असे म्हणाल्या असल्याची साक्ष स्नेहल शिंदे यांनी पोलिसांकडे दिली आहे.

First Published on: May 31, 2019 3:22 PM
Exit mobile version