सनराइज रुग्णालय घोटाळ्यातून उभं; रुग्णालय आणि जागेच्या मालकांना अटक करा- किरीट सोमय्या

सनराइज रुग्णालय घोटाळ्यातून उभं; रुग्णालय आणि जागेच्या मालकांना अटक करा- किरीट सोमय्या

भांडूप पूर्वेला असलेल्या ड्रिम्स मॉलला गुरुवारी रात्री उशीरा आग लागली. ही आग दिवसभर धुमसत राहीली. या ड्रिम्स मॉलमध्ये तिसऱ्या माळ्यावर सनाइज रुग्णालय होते. या रुग्णालयात ७० ते ८० कोरोनाबाधित रुग्ण होते. हे कोविड रुग्णालय होते, हे सनराइज रुग्णालय घोटाळ्यातून उभं केले आहे. रुग्णालयाचे आणि जागेच्या मालकांना अटक करण्याची मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीत सनराइज हॉस्पिटलच्या आयसीयू मधील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आग दूर्घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी घटनास्थळाची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत राज्य सरकारवर आरोप केला आहे. सनराईज रुग्णालय घोटाळ्यातून उभे झाले आहे. पीएमसी बँकेंचा पैसा एचडीआयएलचे राकेश वाधवान यांच्याकडे गेला. त्यांनी या घोटाळ्याच्या पैशातून ड्रिम्स मॉल बांधले, त्यात वरच्या मजल्यावर मुलीसाठी हॉस्पिटल बांधले. या हॉस्पिटलला आधी परवानगी व वापर परवाना (ओसी) मिळाली नव्हती. कोविडच्या काळात महापालिकेनी आपारदर्शकरित्या त्यांना ओसी दिली.

हॉस्पिटलमध्ये फायर सुरक्षत्र व्यवस्था तसेच, हॉस्पिटल सुरक्षा व्यवस्था व इमर्जन्सी सेकंट एक्झिट बरोबर नाही. मी जागेवर भेट घेतली आणि तिथे चौकशी करताना लक्षात आले की, आयसीयूमध्ये धूर गेला, पेशंटला बाहेर काढायला खूप खूप उशीर झाला त्यामुळे हे मृत्यू झाले. या हॉस्पिटलचे मालक व त्या जागेचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि तक्रार दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

First Published on: March 26, 2021 4:41 PM
Exit mobile version