मुंबई विमानतळावर २४७ कोटींचं ड्रग्ज जप्त; DRI ची मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर २४७ कोटींचं ड्रग्ज जप्त; DRI ची मोठी कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर DRI ने २४७ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. झिम्बाब्वेहून आलेल्या दोघांकडून ३५ किलोचं हेरॉइन विमानतळावर जप्त करण्यात आलं आहे.

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी देशभरात पार्ट्या बहोत असतात. खासकरुन मेट्रो शहरांमध्ये अशा पार्ट्या होत असतात. या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवण्याचं काम होणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. त्याअनुषंगाने DRI कामाला लागली होती. DRI ने मुंबई विमानतळावर झिम्बाब्वेच्या दोन नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात एक महिला (४६) आणि एक पुरुष (२७) आहे.

या प्रकरणाची आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. हे ड्रग्ज मुंबईत कुठे कुठे जाणार होतं? या मागे कोण आहे? याचा तपास केला जाणार आहे.

आसाम राईफल्सकडून ५०० कोटींचं ड्रग्ज जप्त

काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या सीमेवर आसाम राईफल्सकडून ५०० कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. ड्रग्ज जप्त केलेल्या घरातील महिलेचा पती चीनचा नागरिक आहे. मणिपूरच्या सीमेवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई समजली जाते. आसाम रायफल्सच्या माध्यमातून हे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलं. ५४ किलोचं ब्राऊन शुगर आणि १५४ किलोचं मेथामफेटाईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण किंमत ही ५०० कोटींच्या वर आहे.

 

First Published on: December 9, 2021 8:05 PM
Exit mobile version