अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले; कांद्याने रडवले

अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले; कांद्याने रडवले

अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले असतानाच, कांद्याच्या वाढत्या दरानेही सर्वसामान्यांच्या डोळयात पाणी आणले आहे. कांद्याचे दर प्रति किलो ८० रूपये तर कोथिंबीर जुडी ही ५० ते ६० रूपयांपर्यंत पोहचली आहे. तसेच भाज्यांचे दरही चढते आहेत ६० रूपयांपासून ते १२० रूपयांपर्यंत भाज्यांचे दर वाढलेले आहेत. महागडया कांद्याचा दर्जाही ओलसर काळपट असून कांद्याने ठाणेकरांना चांगलेच रडवले आहे. परतीच्या पावसाने भातशेतीसह भाजीपाला शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा आणि कोंथीबीरलही त्याचा मोठया प्रमाणात फटका बसला आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर ४० ते ५० रूपये किलो होते आता ८० रूपये प्रतिकोलोवर पोहचला आहे. कांदा महाग होण्याआधी किरकोळ बाजारात ३० ते ४० रूपये प्रतिकिलो तर होलसेल बाजारात कांदा २० रूपये किलोने विकला जात हेाता. कांद्याचे भाव शंभरी गाठण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बाजारात आलेला कांदा हा ओलसर आणि काळपट आहे. पावसामुळे कांदा सडून त्याचे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे शेतीचे व पीकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याच्या शेतीलाही त्याचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे नवीन कांदा अजूनही बाजारात आलेला नाही. सध्या बाजारात स्टॉक केलेला जुना कांदा येत आहे. परतीच्या पावसामुळे नवीन कांदा कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता असून, दीडशे रूपये किलोपर्यंत कांद्याचा भाव वाढू शकतो. भाजीपाला फळबाजा महागल्या आहेत. महिनाभरात भाज्यांचे भाव उतरण्याची शक्यता आहे.

– शिवाजी रासकर, विक्रेता ठाणे

खराब कांदा हा ४० ते ५० रूपयाच्या भावातही बाजारात विक्रीसाठी ठेवला आहे. कांद्याचे भाव वाढणार असल्याने एक ते दोन किलो कांदा घेणारे ग्राहक सात ते आठ किलो कांदा घेत आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत दररोज आठ ते नऊ ट्रक कांदा येतो. मात्र कांद्याची आवक घटली आहे. स्टॉकमध्ये असलेला जुना कांदाचा मार्केटमध्ये आणला जात आहे. स्टॉकमधला कांदाही ओलसर होऊन खराब होत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे.

First Published on: November 4, 2019 7:43 PM
Exit mobile version