मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी वाहतूकीचा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशीराने धाव असून प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. तसेच, रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी जमल्याची माहिती समोर येत आहे. (due to technical issue Central railway line running late)

नोव्हेबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच बुधवारी सकाळी लोकल वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. विशेषत: अप मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीरा धावल्याने हा सगळा घोळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. बराच वेळ उलटला तरी लोकल वाहतूक विलंबाने सुरु असल्याने रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरूस्तीसाठी घटनास्थळी धाव घेतली. सध्या रेल्वेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरूस्त करत आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात गोरेगाव स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.


हेही वाचा – मुंबईच्या हवेचा दर्जा खालावल्याचा केंद्राकडून इशारा; पुढील 2 दिवस वातावरण ‘जैसे थे’च

First Published on: November 9, 2022 9:08 AM
Exit mobile version