राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड वापरून मिळतात आधारकार्ड

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड वापरून मिळतात आधारकार्ड

बनावट आधारकार्ड डोंबीवली

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्के वापरून आधारकार्ड बनवून हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीचा डोंबिवलीमध्ये भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी अशोक काटे आणि अनिल सिंदकर यांच्या विरोधात विष्णू नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे .

असे बनवतात आधारकार्ड

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर (ट्राफिक ऑफिसच्या मागे , डोंबिवली पश्चिम कोपर रोड शिवसेना शाखे जवळ )सायबर कॅफेमध्ये आधारकार्ड बनवले जात असल्याची माहिती भाजप नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होतीयाबबत शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस या तरुणाला त्याठिकाणी आधार कार्ड बनवण्यासाठी पाठवले. त्या ठिकाणी अशोक काटे आणि अनिल सिंदकर या दोघांनी वैभवला आधारकार्ड बनवून देतो. असे सांगत हजारो रुपये खर्च सांगितला. पुढे ते वैभवला नेट फॉर यु सायबर कॅफेमध्ये घेवून गेले. त्या ठिकाणी चक्क राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लेटरहेड तयार करत त्यावर त्याचा फोटो चिटकवून बनावट स्टॅम्प मारत सही केली. हा सर्व प्रकार पाहून वैभव यांना धक्का बसला.

बनावट आधारकार्ड पत्र

आरोपींना अटक

या प्रकरणी विष्णूनगर पोलीस स्थानकात अशोक काटे आणि अनिल सिंदकर या दोघा विरोधात तक्रार दाखल केली. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: February 14, 2019 9:57 PM
Exit mobile version