डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडून तरुण जखमी

डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडून तरुण जखमी

डोंबिवली स्थानक

गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. आज, सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल गुरव (३१) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. धावत्या लोकलमधून पडून विशाल खांबाजवळ पडला. या घटनेमध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेत त्याला जवळील शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवलीच्या आझदे गावातील विशाल गुरव हा ३१ वर्षीय तरुण ९.४० च्या सुमारास धावत्या लोकलमधून खाली पडला. खाली पडताना तो डोंबिवली स्थानका दरम्यान असलेल्या खांबाला जोरात आदळला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती आपल्या घरच्याना कळवली. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी डोंबिवली स्थानक गाठत त्याला तात्काळ शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मध्य रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्य रेल्वेकडून कोणतीही नवीन उपाययोजना होताना दिसत नााही. मध्य रेल्वे या अनेकदा उशिरा धावत असतात. त्यामुळे गर्दी आणखी वाढते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून अनेक मागण्या होत आहेत. पण अजून काहीही घडलेले नाही. मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. तसेच आणखी एक नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्याची देखील गरज असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘या’ माजी आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट


 

First Published on: January 18, 2020 3:12 PM
Exit mobile version