Eid Mubarak! मुंबईतल्या ‘या’ ५ हॉटेलमधून मागवा चमचमीत, लज्जदार जेवण

Eid Mubarak! मुंबईतल्या ‘या’ ५ हॉटेलमधून मागवा चमचमीत, लज्जदार जेवण

Eid Mubarak! मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधून मागवा चमचमीत, लज्जदार जेवण

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. यामुळे याहीवर्षी अनेक सण उत्सव अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरे करावे लागत आहेत. त्यातच आता मुस्लिम समाजाचा पवित्र महिना असलेला रमजान ईद ही यंदा साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. दरवर्षी रमजान ईदनिमित्त मोहम्मद अली रोड येथे अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु, याहीवर्षी कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांना घरच्या घरी ईद साजरी करावी लागणार आहे. मात्र, तुम्ही घरीच सुरक्षित राहून देखील चमचमीत आणि लज्जदार जेवणाचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता अशी काही मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. ज्याठिकाणी तुम्हाला विविध पदार्थांची घर बसल्या चव चाखता येईल. चला तर अशा काही हॉटेल्सची माहिती घेऊया.

पॅक-अ-पाव हॉटेल

वांद्रे, वर्सोवा, पवई आणि फोर्ट याठिकाणी पॅक-अ-पाव या हॉटेलच्या शाखा आहेत. याठिकाणाहून तुम्ही जेवण ऑर्डर करु शकता. याठिकाणी ईद स्पेशल खिमा घोटाळा, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, हर्ब शेख बिर्याणी, मटण कबाब, ऐग कबाब, चिकन कबाब, चिज कबाब आणि यासह असे एक ना अनेक पदार्थ या हॉटेलमध्ये तुम्हाला मिळतील. या हॉटेलमधून तुम्ही ऑर्डर देखील करु शकता.

द बॉम्बे कँटिंग, लोअर परेल

हे एक पारंपारिक हॉटेल असून फार जुने हॉटेल आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये ईदनिमित्त विविध स्पेशल पदार्थ चाखता येतात. यातील सर्वात फेम्स डिश म्हणजे तंदुरी नान. याव्यतिरिक्त शीख कबाब, उकडलेली अंडीसह कॅरेमल कॅरट पुलाव याठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. खास खासियत म्हणजे केवळ ईद स्पेशल असल्यामुळे तुम्हाला ही मेजवानी येत्या १६ मेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जे डब्लू मॅरियेट, जुहू

हे एक लक्झरी हॉटेल असून याठिकाणी तुम्हाला नॉनव्हेजसह व्हेज पदार्थांची देखील चव चाखता येईल. ईद स्पेशलनिमित्त याठिकाणी अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येईल. व्हेज पदार्थांमध्ये पकोडा, आमचूर भेंडी, बीटरूट गॅलोटी, सबझ गिलाफी सीख यासह एक ना अनेक पदार्थांची चव चाखू शकता. तर नॉनव्हेजमध्ये अफगाणी मुरग टिक्का, चिकन पकोडा, खिमा पाव, तवा मुरग आणि बिर्याणीसह एक ना अनेक पदार्थांची चव तुम्ही चाखू शकता. याकरता सकाळी १० ते रात्री १० पर्यंत तुम्ही केव्हाही ऑर्डर देऊ शकता.

लकी रेस्टॉरंट, वांद्रे

ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसे हे हॉटेल आहे. १९३८ पासून हे हॉटेल वांद्रे स्थानकाजवळ आहे. हे हॉटेल फार जुने असून याठिकाणी अनेक मुंबईकर येऊन जेवून जातात. हे सर्वात प्रसिद्ध असे हॉटेल आहे. कोणाला बिर्याणी खायची असल्यास या हॉटेलचे नाव सुचवण्यात येते. तसेच बिर्याणीशिवाय याठिकाणी चिकन पुलाव, चेल्लो कबाब, मटण खेपेसा, मटण कोर्मायासह अनेक पदार्थांची तुम्ही चव चाखू शकता. या हॉटेलची तुम्ही स्विगी आणि झोमॅटोवरुन देखील ऑर्डर देऊ शकता.

सॅफरॉन बाय द सेसी स्पून, नरिमन पॉईंट

जर तुम्हाला थ्री कॉर्स जेवणाचा आस्वाद घ्यायचा असल्यास तुम्ही या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करु शकता. विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचे तुम्ही याठिकाणी जेवण ऑर्डर करु शकता. व्हेजमध्ये दही कबाब, पनीर मखनवाला स्टफ नान, व्हेज शिख कबाब आणि पनीर पटियाला कबाब. त्यासोबतच दम आलू काश्मिरी बिर्याणी आणि जेवणानंतर तोंड गोड करण्यासाठी मूग हलवा. या सर्व पदार्थांची चव तुम्ही येत्या १७ मे पर्यंत चाखू शकता. तसेच हे पदार्थ स्विगी आणि झोमॅटोवरुन मागवता येऊ शकतात.


हेही वाचा – HealthTips: मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर दालचीनी,औषधी गुणधर्मायुक्त दालचीनीचे फायदे जाणून घ्या!


First Published on: May 14, 2021 6:50 PM
Exit mobile version