एमएमआरडीए मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना

एमएमआरडीए मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात तास तक्रारींवर पाठपुरावा करून राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका इत्यादी विविध आपत्ती नियंत्रण संस्थांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच माहितीची देवाण- घेवाण करण्यात येणार आहे. हे नियंत्रण कक्ष ८ जून पासून १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा तीन शिफ्टसह कंट्रोल रूम २४ तास चालू राहणार आहे. या नियंत्रण कक्षात रात्री ११ ते  सकाळी ७ या वेळेत पुरुष कर्मचारी असणार तर सकाळी ७ ते दुपारी ३  यावेळेत महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसर्‍या दिवशी एक दिवसाची सूट देण्यात येणार आहे.

प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प ठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांची गैरसोय कमी व्हावी या उद्देशाने एमएमआरडीएने या कंट्रोल रूमची स्थापना केली गेली आहे. कंट्रोल रूमचे अधिकारी एमएमआरडीए च्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत पार पाडण्यासाठी मदत  करतील. “कंत्राटदारांना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बॅरिगेड्स, खराब झालेल्या रस्त्याची कामे  पूर्ववत करणे, रस्त्यांवरील घाण साफ करून त्यावर तोडगा काढणे या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव म्हणाले की, ज्या ठिकाणी पाण्याचे नाले आणि जलकुंभाच्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसेल तेथे पुरेशा क्षमतेचे पाण्याचे पंप ठेकेदारांना देखील ठेवण्याची गरज आहे ते पुढे म्हणाले की, मुंबईकर विविध बाबींवर नियंत्रण कक्षाची मदत घेण्यास सक्षम असतील. यामध्ये झाडे पडणे, पाणी साचणे, अपघात, रस्त्यांवरील खड्डे इत्यादी विषयांची नोंद करता येणार आहे. तसेच, कंट्रोल रूमचे अधिकारीदेखील असामान्य घटनांबद्दल किंवा येऊ घातलेल्या धोक्यांविषयी माहिती घेतील.

नियंत्रण कक्ष रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट, अग्निशमन दल आणि शहरातील महत्वाच्या यंत्रणांसोबत काम करणार आहेत. नियंत्रण कशाला संपर्क साधण्यासाठी देण्यात आलेले नंबरमध्ये थेट लाईन- 022-26591241, इंटरकॉम- 022-26594176, मोबाईल नंबर- +91-8657402090

First Published on: June 10, 2020 8:34 PM
Exit mobile version