मूल पाहिजे, माझ्यासमोर सेक्स करा; भोंदूबाबा गजाआड

मूल पाहिजे, माझ्यासमोर सेक्स करा; भोंदूबाबा गजाआड

प्रातिनिधिक फोटो

ठाणे जिल्ह्यात एका स्वंयघोषित बाबाला कोर्टाने बलात्कार प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुल हवं असेल तर माझ्यासमोर सेक्स करा, अशी जबरदस्ती एका दाम्पत्यावर या बाबाने केली होती. ठाणे जिल्हा न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी मंगळवारी आरोपी योगेश कुपेकर याला भांदवि कलम ३७६ (बलात्कार) आणि ३५४ (छेडछाड) तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा – २०१३ च्या अंतर्गत दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच तीस हजारांचा दंडही त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे.

पीडित दाम्पत्य २०१४ साली या भोंदूबाबाकडे पहिल्यांदा गेले होते. त्यानंतर २०१६ साली हा अघोरी गुन्हा घडला. लग्न झाल्यानंतर मुल होत नाही, म्हणून हे दाम्पत्य अंधश्रद्धेला बळी पडून या बाबाकडून उपचार घेत होते. धक्कादायक म्हणजे तब्बल अडीच वर्ष हा भोंदूबाबा हे अघोरी, अश्लिल चाळे करत होता. यासोबत कुपेकरने दाम्पत्याकडून १० हजाराची रक्कमही लाटली होती.

पत्नीची आत्महत्येची धमकी

२०१६ साली या बाबाने दाम्पत्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांनीही आपल्या समोर शरीरसंबंध प्रस्थापित करावे, असे सांगितले. पतीने आपल्या पत्नीला या अघोरी प्रथेसाठी कसेबसे तयार केले होते. मात्र हे करत असताना भोंदूबाबाने पतीला काही विधी एकांतात करायचे असल्याचे सांगून पतीला घराबाहेर जायला सांगितले आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचा लैंगिक छळ केला. अखेर पत्नीने कुपेकरचे सर्व अघोरी कृत्य पतीच्या कानावर घातले आणि आत्महत्येची धमकी दिली. तेव्हा कुठे पीडित दाम्पत्याने वर्तक नगर पोलिस स्थानकात कुपेकर विरोधात गुन्हा दाखल केला.

विशेष प्रकरणाचा दर्जा, बाबाला कठोर शिक्षा

फिर्यादीच्या वतीने खटला चालवणाऱ्या वकिल रेखा हिवराळे यांनी न्यायाधीशांसमोर संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. कुपेकरच्या कृत्यामुळे पीडित महिलेला मानसिक धक्का बसला असून तिच्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारही घेत होती. या मानसिक धक्क्यामुळे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, कुपेकरने दाम्पत्याच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अघोरी कृत्य केले आहे. विशेष प्रकरण म्हणून याकडे पाहीले पाहीजे. त्यामुळेच बलात्काराच्या कलमाखाली कुपेकरला शिक्षा देण्यात आली आहे.

First Published on: October 25, 2018 12:05 PM
Exit mobile version