Fake News: ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना अतिदक्षतेच्या सूचना

Fake News: ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना अतिदक्षतेच्या सूचना

असं करा आणि व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये 'टाइपरायटर फॉन्ट'ची मज्जा घ्या

ठाणेकरांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या सुचनांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल झाल्याचे समोर येत आहे. या मेसेजमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना हा भारतात लवकरत ३ स्तरावर जाणार असून त्यामुळे अतिदक्षता पाळण्याची गरज उद्भवली आहे. याकरता निर्देश जारी केले जात आहेत, असे नमूद केले आहे. मात्र असा कोणताही निर्देश दिलेला नसल्याचे ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून अशी कुठलीही प्रेसनोट जिल्हा माहिती कार्यालयाकडे प्रसिद्ध करण्यासाठी दिलेली नाही. तरी या संदेशामध्ये तथ्य नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच चुकीची माहिती पसरवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. चुकीचा संदेश अन्य ग्रुप वा व्यक्तींना पाठवू नये ही विनंती, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये – 

ठाणे कलेक्टर कडून सूचना

लवकरच कोरोना 3rd स्टेजला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :

सविस्तर

१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुवून घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुवा.

२. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रेमध्ये २४ तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.

३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.

४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका.

५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.

६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.

७. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.

८. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, मे महिना वगैरे नंतर बघुया.

९. हळद दूध प्या म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.

१०. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.

११. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.

१२. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.

१३. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.

१४. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.

१५. कपड्याना इस्त्री घरीच करा.

१६. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.

१७. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या

१८. स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या.

हेही वाचा –

मुंबई महानगर क्षेत्रातल्या ७ महापालिकांमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

First Published on: July 2, 2020 2:24 PM
Exit mobile version