लाच घेतल्याची टिकटॉक क्लिप खोटीच

लाच घेतल्याची टिकटॉक क्लिप खोटीच

टिकटॉक

नो पार्किगमधील वाहनावरील दंडात्मक कारवाई होतानाचा चित्रिकरणाचा खोटा टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न एका विद्यार्थ्याच्या चांगलाच अंगलट आला. मात्र, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोलिसांनी माणुसकीच्या नात्यातून विद्यार्थ्यावर कारवाई केली नाही.

पालघर शहरातील एका वाहतुक पोलिसाने नो पार्किंग झोनमधील दचाकी वाहन सोडण्यासाठी लाच घेतल्याची व्हिडीयो क्लिप वायरल झाली होती. पोलीस लाच घेत असल्याचा टिकटॉक व्हिडीओ काढून वायरल केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पोलिस तपासात लाच घेतल्याची ती वायरल टिकटॉक क्लिप खेाटीच असल्याचे व्हिडीयो काढणार्‍या विद्याथ्यार्ंनी कबुल केले.

पालघर शहरातील नो पाकिर्ंंग झोनमधील दुचाकीवर दंडात्मक कारवाईनंतर दंडाची रक्कम वसुल करणार्‍या वाहतुक पोलिस शिपाई मोहितेनी लाच घेतल्याची खोटी क्लिप बनवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनेच समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचे सायबर चौकशीत समोर आले आहे. विनित शिरीष मेहेर रा.सातपाटी हा अल्पवयीन मुलगा आपल्या वडीलांच्या नावे असलेले दुचाकी वाहन परिक्षेसाठी सोनापंत दांडेकर कॉलेजला घेऊन आला होता.परिक्षा संपल्यानंतर वडापाव घेण्यासाठी आपला मित्र मितसह भाजी मंडईत बिकानेरी हॉटेलात गेला. दुचाकी मात्र रस्त्यावर नो पार्किग झोनमध्ये पार्क केली होती.

नगर परिषदेच्या वाहतुक पथकाने ते वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले होते. ते वाहन सोडवण्यासाठी विनित शिरीष मेहेर हा आपला मित्र मित किरण धनुसह पोलिस ठाण्यात गेला. तेव्हा वाहतुक पोलिस शिपाई मोहितेनी 200 रूपयांची दंडात्मक ई चालान इलेक्ट्रॉनिक उपकरणातुन काढुन दिली. हा सगळा प्रकार मित यांने आपल्या मोबाईलमध्ये बेकायदेशिररित्या टिपुन घेतला. आणि त्यात तफावत निर्माण करत वाहतुक पोलिस शिपाई मोहितेंनी लाच घेउन वाहन सोडल्याचे टिक टॉक व्हिडीयो क्लिप वायरल केली.

वायरल टिकटॉक व्हिडीयोमुळे पालघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक गौरव सिंह यांनीही दखल घेउन कारवाईचे आदेश दिले होते. प्रसारमाध्यमावर टिकटॉक व्हिडीयो बनवुन टाकण्याचा छंद त्या विद्याथ्यार्ंना भोवला असता. पण मजा करण्यासाठी आपण क्लिप तयार केल्याची कबुली दिल्यानंतर खेाटी क्लिप तयार करून वाहतुक पोलिसांवर दबाब निर्माण करणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला पालघर पोलिसांनी समज देउन सोडुन दिले.

अशा खोडसाळ वृत्तीच्या विद्याथ्यार्ंमुळे उगाच इमाने इतबारे कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक पोलिसांवर वरिष्ठांकडून होणार्‍या कारवाईला बळी पडावे लागते. वरिष्ठांनी सखोल चौकशी केल्याने सत्य बाहेर आले. नाही तर या मुलांनी माझ्यावर संक्रात आणली होतीच.
-प्रमोद मोहिते,वाहतूक पोलीस

First Published on: October 16, 2019 5:04 AM
Exit mobile version