कोरोनाने घेतला पिता-पुत्राचा जीव, वडिल गेल्याचे कळताच मुलाला हार्ट अटॅक!

कोरोनाने घेतला पिता-पुत्राचा जीव, वडिल गेल्याचे कळताच मुलाला हार्ट अटॅक!

कोरोना मृत्यू आकडेवारी ठरविण्यासाठी नवीन निकष, ICMR चा मोठा निर्णय !

कोरोनाची लागण झाल्यामुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता- पुत्राचा एमजीएम रूग्णालयात मृत्यू झाला आहे. नवीन पनवेलमधील ७० वर्षीय सीताराम तांबे यांचे मंगळवारी रात्री २ च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त सीताराम यांच्या 40 वर्षीय मुलगा शशेंद्र तांबे यांना समजताच वडिलांच्या मृत्यूचं दु:ख त्यांना असह्य झाले आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तांबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

शशेंद्र यांचे वडिल सीताराम हे काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेतून निवृत्त झाले. तर शशेंद्र हे पनवलेला कोचिंग क्लासमध्ये आहेत. शशेंद्र यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे.

अंत्यसंस्कारासाठी ६ हजार

पनवेल पालिकेमार्फत कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नवीन पनवेल येथील पोदी येथे आणि पनवेल शहरातील अमरधाम येथे व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी असलेल्या विद्युत शव दाहिन्या खाजगी संस्थेमार्फत चालवल्या जात असून विद्युत दाहिनीवरील अंत्यसंस्कारासाठी पोदी येथे 2,500 तर अमरधाम येथे 2,000 रुपये रक्कम आकारण्यात येते.

विद्युत दाहिनीत बिघाड झाल्यास लाकडावरील अंत्यसंस्कारासाठी ५ हजार रुपये आकारले जातात. मात्र, तांबे कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर सीताराम यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी 6 हजार रुपये आकारण्यात आले आहेत.


हे ही वाचा – ‘You are my Angel’, रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे ते WhatsApp Chat व्हायरल!


First Published on: August 21, 2020 4:24 PM
Exit mobile version