एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे येथील रहिवाशांचं जीवन पूर्वपदावर यावं, यासाठी आता मदतीचा पूर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून येथील पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. शासकीय पातळीवरसुद्धा पूरग्रस्तांना मदत सुरू आहे. आता एफडीएकडूनही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. एफडीएकडून करण्यात येणाऱ्या मदतीत जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यपदार्थ आणि औषधांचा समावेश आहे.

जीवनावश्यक वस्तू

राज्याच्या एफडीकडून पूरग्रस्तांना शुक्रवारी सायंकाळी मदत पाठवण्यात आली. या मदतीमध्ये जीवनाश्यक वस्तूंचा समावेश आहे. शिवाय मदत पॅकेजमध्ये पिण्याचं पाणी, ब्लीचिंग पावडर, फिनाईल लिक्विड, हातमोजे, नाकाचे मास्क इत्यादी साहित्य पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा – उरणमध्ये ओएनजीसी प्लांटमध्ये बिघाड; मुंबईत सीएनजीचा अभाव

एफडीएच्या पुणे जिल्हा विभागाची मदत

शिवाय याआधीच एफडीएच्या पुणे जिल्हा विभागाच्या कार्यालयाकडून १.६८ लिटर पॅक केलेल्या पिण्याच्या पाण्यासह मदत साहित्य पाठवण्यात आले होते. सोबत ५० बॉक्समध्ये भरुन बिस्कीटचे पुडे, २.५० टन तांदूळ, ६० किलो वेगवेगळ्या डाळी, १ टन खाकरा, आणि पूरग्रस्त भागात दहा हजार लिटर फळांचा रस आणि ७५ लाख रुपयांची औषधे पाठवण्यात आली होती. तसंच, विभागाकडून येथील लोकांना भोजनदेखील देण्यात आले. शिवाय, पुनर्वसन शिबिरात राहणाऱ्या ५५० लोकांना नाश्ता, फळे, चहा, पाणी इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या. तसंच, परिसरातील ६ हजार पूरग्रस्तांना २ हजार खाद्यपदार्थांची पाकिटे आणि तांदूळ, रवा, गव्हाचे पीठ इत्यादी आवश्यक खाद्यपदार्थांची आणि इतर औषधींची व्यवस्था करण्यात आली.

पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी एफडीएने राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यालाच प्रतिसाद म्हणून कोल्हापूरच्या अनेक हॉटेल मालकांनी, संस्थांनीही पुढाकार घेत जवळपास २० हजार पूरग्रस्तांना दररोज अन्न पुरवठा केला जात आहे.

महाराष्ट्र एफडीए नेहमीच अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये पुढाकार घेतं. गेल्या वर्षीही प्रशासनाने केरळमधील पूरग्रस्तांसाठी जवळपास ४० लाख औषधांची मदत पाठविली होती.
डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन

First Published on: August 17, 2019 5:46 PM
Exit mobile version