रासायनिक आईस्क्रिम बनवणाऱ्या कारखान्यांवर एफडीएची कारवाई

रासायनिक आईस्क्रिम बनवणाऱ्या कारखान्यांवर एफडीएची कारवाई

रासायनिक आईस्क्रिम बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

वाढत्या गर्मीमुळे अनेकांचा थंड आईस्क्रीम आणि कुल्फी खाण्याकडे अधिक कल असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच याला पसंती असते. पण रस्त्यावर सहज मिळणारी कुल्फी आरोग्यास हानिकारक ठरत आहे. नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील विविध ठिकाणी छापे मारून रसायनांचा वापर करून बनवलेल्या कुल्फी आणि कॅण्डी जप्त केल्या आहेत.

रसायने वापरुन तयार केली जाते आईस्क्रिम

वाढत्या गर्मीमध्ये कुल्फी व कँडीला असलेली मागणी लक्षात घेऊन काही कारखानदारांनी नफा कमावण्याच्या उद्देशाने रसायने व अन्य निकृष्ट घटकांचा वापर करून मोठ्या प्रमाणात कुल्फी आणि कँडी बनवल्या आहेत. याबाबत एफडीएकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कांदिवली चारकोप आणि दहिसर येथील आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने वापरून बनवलेली आणि आरोग्यास घातक असलेली कुल्फी आणि कँडी जप्त करण्यात आली.

रसायनयुक्त आईस्क्रिम खाल्याने आजारांना निमंत्रण

छापा मारण्यात आलेल्या कारखान्यात कुल्फी बनवण्यासाठी जुनी आणि खराब भांडी वापरण्यात येत होती. तसेच जुनी उपकरणे, रसायने, जुने रंग, अशुद्ध पाणी या गोष्टींचा सर्रास वापर करण्यात येत होता. निकृष्ट दर्जाची आणि रसायनयुक्त कुल्फीमुळे हेपेटायटिस, डायरिया, पोटाचे तसेच मूत्रपिंडाचे आजार होण्याचे शक्यता असल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.

First Published on: May 28, 2018 8:48 AM
Exit mobile version