ठाण्यात ट्रेलरच्या धडकेत महिलेसह तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ठाण्यात ट्रेलरच्या धडकेत महिलेसह तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अपघात

ठाण्यात गुरुवारी रात्री पुन्हा एक भयंकर अपघात घडला असून यामध्ये एका महिलेसह तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटारसायकला ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये शिक्षिकेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथे हा अपघात घडला असून पळून चाललेल्या ट्रेलर चालकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ब्रम्हांड फेज सातमध्ये राहणारे दिलीप विश्वकर्मा खासगी कंपनीत काम करतात. पत्नी चंद्रावती (वय ३१) खासगी शाळेत शिक्षिका असून पत्नी मुलगी प्रांजल हिला घेऊन मीरा रोडला माहेरी गेली होती. गुरुवारी रात्री कामावरुन सुटल्यानंतर दिलीप पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी मीरा रोडला गेले होते. रात्री १०.३० वाजता मोटारसायकलवरुन विश्वकर्मा कुटुंब घरी येत असताना ट्रेलरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. तिघेही उजव्या बाजूला रस्त्यावर पडले. यावेळी ट्रेलरखाली चिरडून चंद्रावती हिचा जागीच मृत्यू झाला तर प्रांजल गंभीर जखमी झाली. दिलीप विश्वकर्मा हे किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेली तीन वर्षाची प्रांजल हिला रूग्णालयात दाखल केले. मात्र तिचाही मृत्यू झाला. पळून गेलेला ट्रेलरचालक चंद्रशेखर बिष्णोई याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

मनसेची‌ कल्याणमध्ये चाणक्यनीती? मतदारांमध्ये चर्चा

First Published on: October 11, 2019 12:33 PM
Exit mobile version