एसएनडीटी कॉलेजमधला धक्कादायक प्रकार; वॉर्डनविरोधात तक्रार दाखल

एसएनडीटी कॉलेजमधला धक्कादायक प्रकार; वॉर्डनविरोधात तक्रार दाखल

जूहू एसएनडीटी कॉलेज

मुंबईतल्या जुहू येथे असणाऱ्या एसएनडीटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाच्याविरोधामध्ये आंदोलन केले होते. एसएनडीटी कॉलेजमध्ये वॉर्डनने एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास सांगितले याविरोधात विद्यार्थिनी आक्रमक झाल्या आहेत. बीटेकच्या विद्यार्थिनीला एसएनडीटी कॉलेज हॉस्टेलच्या एका महिला वॉर्डनने जबरदस्ती कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी वॉर्डनला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

स्लिवलेस घातल्याने घडला प्रकार

रविवारी एसएनडीटी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये बीटेकच्या एका विद्यार्थिनीने स्लिवलेस कपडे घातले होते. तिला स्लिवलेस कपडे का घातले असा जाब वॉर्डन रचना झवेरीने विचारला. स्कीन इन्फेक्शन झाले असल्याने स्लिवलेस घातले असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले आहे. तर वॉर्डनने नेमकं काय स्कीन इन्फेक्शन झाले आहे हे सर्व कपडे काढून दाखव असले सांगितले. या वॉर्डनने तिला एका रुममध्ये नेले आणि सर्व कपडे जबरदस्ती उतरवण्यास सांगितले असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. या घटनेनंतर एसएनडीटी कॉलेजमधील विद्यार्थिनी आक्रमक झाल्या आणि त्यांनी कॉलेजविरोधात आंदोलन केले.

वॉर्डनला सक्तीच्या रजेवर पाठवले

या घटनेनंतर विद्यार्थिनीने वॉर्डनविरोधाता सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाच्या तपासाच्या कॉलेज प्रशासनाकडून तीन सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती तीन दिवसामध्ये संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे. कॉलेजने हॉस्टेलच्या वॉर्डन रचना झवेरीला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे तसंच कॉलेजमध्ये परवानगी शिवाय येण्यास मनाई केली आहे. विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, वॉर्डनने कॉलेजच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

First Published on: October 15, 2018 8:22 PM
Exit mobile version