सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे केईएममधील आगीची दुघर्टना टळली

सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे केईएममधील आगीची दुघर्टना टळली

सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे केईएममधील आगीची दुघर्टना टळली

मुंबईतील पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये वायू गळतीमुळे वास येत असल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी परळ येथील केईएम रुग्णालयात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गॅस वाहिनीवर आग लागण्याची दुघर्टना घडली. परंतु, ही आग रौद्ररुप धारण करण्यापूर्वीच केईएम रुग्णालयातील एनडीआरएफच्या धर्तीवर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुरक्षा रक्षकांनी अग्निसुरक्षा नळकांड्यांचा वापर करत तात्काळ ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच महापालिका सुरक्षा रक्षकांनी ही आग विझवल्याने मोठी आपत्कालिनक दुघर्टना टळली.

काय आहे नेमके प्रकरण?

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागातील जवानांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे देतानाच त्यांना एनडीआरएफच्या धर्तीवर प्रशिक्षण आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात या एनडीआरएफचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांची विशेष मदत घेतली जाते. परंतु, हे एनडीआरएफसह आपत्कालिन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यामुळे सोमवारी केईएम रुग्णालयांत एक मोठी आगीच्या दुघर्टना होण्यापासून तैनात सुरक्षा रक्षकाने वाचवली. सोमवारी दुपारी अडीच वाजता केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील गॅस वाहिनीला आग लागण्याची घटना घडली.आगीची ही घटना घडताच रुग्णालयातील आगप्रतिबंधक नळकांड्याचा वापर करत सुरक्षा रक्षकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे तसेच तातडीने आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर केल्यामुळे आग मोठी पसरण्यापूर्वीच विझवण्यात त्यांना यश मिळाले. एक वर्षांपूर्वी अंधेरीतील इएसआयएस रुग्णालयात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागण्याची दुघर्टना घडली होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे दिल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा आता मिळताना दिसत आहे.

First Published on: September 23, 2019 10:37 PM
Exit mobile version