प्रभादेवी येथे स्टोव्हच्या भडक्याने आग; दोघेजण जखमी

प्रभादेवी येथे स्टोव्हच्या भडक्याने आग; दोघेजण जखमी

Prabhadevi stove blast- प्रातिनिधिक फोटो

प्रभादेवी येथील चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात केरोसीन स्टोव्हमुळे भडका उडाला व आग लागून पूजा चौरसिया (२८) व दिलीप चौरसिया (४५) हे दोघेजण भाजल्याने जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Fire at Prabhadevi due to flare up of stove Two people injured

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील तळमजला अधिक चार मजली सिद्धी प्रभा को.ऑप.हौ. सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या चौरसिया यांच्या घरात केरोसीनवरील स्टोव्हचा अचानक भडका उडाला. त्यामुळे घरातील कपडे, ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे यांना भीषण आग लागली. या आगीमुळे पूजा चौरसिया (२८) व दिलीप चौरसिया (४५) हे दोघेजण भाजल्याने जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तत्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,  त्यामुळे  हे दोघेही बचावले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: महाराष्ट्रात म्हाडा बांधणार १२ हजार घरे; १०१८६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, बीडीडीसाठी २ हजार कोटी )

स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून चौकशी 

दरम्यान, आगीची घटना घडल्याचे समजताच स्थानिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली. तर काहींनी चौरसिया यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीच्या वृत्ताने संपूर्ण इमारतीमधील नागरिक धास्तावले व भयभीत झाले होते. दरम्यान, आगीच्या घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य केले. मात्र ही आग लागली की आणखीन कोणत्या वेगळ्या कारणास्तव आग लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

First Published on: April 6, 2023 9:49 PM
Exit mobile version