गिरगावमधील रहिवासी इमारतीला आग, जीवितहानी नाही

गिरगावमधील रहिवासी इमारतीला आग, जीवितहानी नाही

प्रातिनिधिक फोटो

गिरगाव येथील कुंभारवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. लाखा कारा नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागल्यानंतर येथील रहिवासाश्यांनी अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. सकाळी ११.२४ वाजता ही घटना घडली आहे.

First Published on: January 30, 2019 12:13 PM
Exit mobile version