साकीनाका जंक्शन येथील निळकंठ भवनला भीषण आग

साकीनाका जंक्शन येथील निळकंठ भवनला भीषण आग

मुंबईतील साकीनाका परिसरातील निळकंठ भवनाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. साकीनाका जंक्शन परिसरात असणाऱ्या नीलकंठ भवन याठिकाणी ही आग लागली आहे. नीळकंठ भवनच्या इमारतीत अनेक हॉटेल्स, बँक आणि इतर अस्थापनांची कार्यालयं असल्याची माहिती मिळतेय. ही भीषण आग नीळकंठ भवनच्या दुसऱ्या मजल्याला लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्याची माहिती मिळतेय. सध्या ही आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम याठिकाणी सुरू आहे. या भीषण लागलेल्या आगीचे लोट साकीनाका परिसरात पसरत असून नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.

 

First Published on: March 14, 2021 1:28 PM
Exit mobile version