मुंबईतील माझगाव परिसरातील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील माझगाव परिसरातील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील माझगाव येथील परिसरातील एक रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना वाचविण्यात यश मिळवले आहे. सातव्या मजल्यावर अजून सात लोक अडकले आहे असून बचावकार्य सुरू आहे. माहितीनुसार, ही इमारत सात मजली असून दोन फ्लॅटला आग लागली आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

माझगाव येतील या इमारतीचे शिरिन मंझिल असे नाव आहे. या इमारतीच्या दोन फ्लॅटमध्ये दुपारी सव्वाबार वाजेच्या सुमारास आग लागल्याचे म्हटले जात आहे. या इमारतीत एकूण लोक किती अडकले आहेत? याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तसेच फ्लॅटमधून धुराचे लोळ बाहेत येत असल्याकारणाने मदतकार्यात अडचणी निर्माण होत आहे.

First Published on: May 18, 2020 2:45 PM
Exit mobile version