कोचिंग क्लासेसची अग्निशमन दलाच्यावतीने तपासणी

कोचिंग क्लासेसची अग्निशमन दलाच्यावतीने तपासणी

मुंबई अग्निशमन दल

सुरतमधील कोचिंग क्लासमधील आग दुर्घटनेनंतर मुंबईतील खासगी कोचिंग क्लासविरोधात अग्निशनम दलाच्यावतीने धडक मोहिम हाती घेण्यता आली आहे. मुंबईतील कोचिंग क्लासेसची तपासणी करण्याचे काम मुंबई अग्निशमन दलामार्फत सुरु आहे. मुंबईतील एकूण कोचिंग क्लासेसची एकूण संख्या, आवश्यक माहिती शिक्षण विभाग तसेच दुकाने व आस्थापना या खात्यामार्फत घेवून यांची तपासणी करण्यात येईल व त्याबाबतचा अहवाल समितीला सादर करण्यात येईल, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये कोचिंग क्लासमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत मुंबईतील गल्लीबोळात अशाप्रकारचे कोचिंग क्लासेस सुरु आहेत. त्यांच्या सुरक्षेची काय उपाययोजना आहे, असा सवाल करत अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेसची तपासणी करून विनापरवाना चालवल्या जाणार्‍या क्लासेसची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर अग्निशमन दलाने मुंबईमध्ये असलेल्या कोचिंग क्लासेसबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या शिक्षण तसेच दुकाने व आस्थापने यांच्यामार्फत माहिती घेवून तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत खासगी शिकवणी वर्ग संस्थामार्फत सुरु करण्याकरता महापालिकेची मान्यता मिळवणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून अशा संस्थांना इतर नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांप्रमाणे आवश्यक त्या अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक केली जावी, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. महाराष्ट् अग्नी प्रतिबंधक व अग्निसुरक्षा अधिनियम २००६ नुसार सर्व शैक्षणिक संस्थांचे अग्निपरिक्षण केले जाते. मात्र, खासगी शिकवणी संस्थांवरील अर्निबंधामुळे इतर शैक्षणिक संस्थाप्रमाणे याठिकाणी वायूवीजन, पुरेसा उजेड, मोठ्या वर्गखोल्या, आपत्कालीन मार्ग अशा अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव असतो, असे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

बेस्टला लवकरच १०० कोटींचा हप्ता

मंडईच्या दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

First Published on: June 20, 2019 9:38 AM
Exit mobile version