आयुक्तांच्या कार्यालयात सॅनिटायझर हाताला लावूनच प्रवेश

आयुक्तांच्या कार्यालयात सॅनिटायझर हाताला लावूनच प्रवेश

आयुक्तांच्या कार्यालयात सॅनिटायझर हाताला लावूनच प्रवेश

करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना जाहिर करत जनतेला स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले जात असतानाच खुद्द महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या कार्यालयामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये प्रत्येक वेळी आतबाहेर करणार्‍या शिपायांप्रमाणेच अधिकारी आणि अभ्यांगतांच्या हाती सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे खुद्द महापालिका आयुक्त आपल्या दालनात अशी काळजी घेत असल्याने प्रत्येक नागरिकांनाही आता स्वयंशिस्त बाळगत जास्तीत जास्त हात स्वच्छ राखले जावे. दालनाबाहेरील सुरक्षा रक्षकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्याशिवाय आत प्रवेश दिला जावू नये, असे स्पष्ट आदेश असल्याने शिपायांपासून ते सर्वांनाच अशाप्रकारे हात स्वच्छ करतच आयुक्तांच्या भेटीला जावे लागत आहे.

महापालिकेच्या प्रवेशद्वारांजवळ पत्र स्वीकारण्याचा प्रयत्न

करोना विषाणूंचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह राज्य सरकार सज्ज झाले असून त्याअंतर्गत मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यांवरील ५० टक्के दुकाने आणि आस्थापने बंद ठेवण्याचे फर्मान जारी केले आहेत. तसेच अनेक खासगी कंपन्यांमधील ५० टक्के कर्मचार्‍यांना घरुनच काम करण्याची मुभा देण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले आहे. मात्र, ‘करोना’ चा सामना करण्यासाठी महापालिकेत येणार्‍या लोकांची गर्दीही कमी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार, मुंबईत विविध खात्यांची पत्रे तसेच महत्वाची कागदपत्रे स्वीकारण्यासाठी विविध खात्यांच्या कर्मचार्‍यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारांजवळ बसवण्यात आले आहे. नागरिकांसह विविध खात्यांच्या कर्मचार्‍यांना महापालिकेच्या प्रवेश क्रमांक २, ४, ६ आणि ७ याठिकाणी टेबलची व्यवस्था करून देत मुख्यालयात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेरच्या बाहेरच ही पत्र स्वीकारण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये महापालिका चिटणीस, लेखा विभाग, महापौर कार्यालय, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, तसेच विविध खात्यांची पत्र स्वीकारण्यासाठी इमारतीच्या तळमजल्यावरच व्यवस्था करत मुख्यलयातील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्तांनी केला आहे.

First Published on: March 19, 2020 8:42 PM
Exit mobile version