मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा – अस्लम शेख

मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा – अस्लम शेख

महाराष्ट्रातील मच्छिमारांना ‘कोरोना’ आपत्तीत फार मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेलवरील परताव्याच्या रक्कमेस वित्त विभागाने परवानगी दिली असून येत्या काही दिवसांत थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे (डी.बी.टी) ही रक्कम मच्छिमारांंच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

डिझेलवरील परताव्यासाठी तरतुद करण्यात आलेल्या ११० कोटींच्या निधींपैकी फेब्रुवारी २०२० अखेरपर्यंत ७८ कोटी डिझेल परताव्याचा निधी वितरीत करण्यात आला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या उर्वरीत ३२ कोटींपैकी १९.३५ कोटी निधी उद्भवलेल्या ‘कोरोना’ आपत्तीमुळे शासनाच्या प्राधान्यक्रम देयकानुसार रोक लावल्याने ३१ मार्च २०२० रोजी हा निधी परत गेला होता.

कोरोनाच्या आपत्तीकाळात मच्छिमार बांधवांना दिलासा मिळावा यासाठी हा निधी परत आणण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून, त्यासंबंधीचे निर्देश संबंधीत विभागास देण्यात आलेले आहेत. मुंबई शहर व उपनगरासाठीचा १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधीचे धनादेशही सहायक आयुक्तांकडे जमा झालेले आहेत, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

हेही वाचा –

लवकरच पाऊस मुंबईत धडकणार; हवामान खात्याचा अंदाज

First Published on: May 12, 2020 2:05 PM
Exit mobile version