‘या’ व्यक्तींनी अनुभवली २६/११ची काळ रात्र

‘या’ व्यक्तींनी अनुभवली २६/११ची काळ रात्र

'या' व्यक्तींनी अनुभवली २६/११ची काळ रात्र

विजू चौहान

विजू चौहान यांना २६ नोव्हेंबर रोजी रात्री कामा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान डॉक्टर विजू चौहान यांना तपासत असताना गोळीबाराचा आवाज सुरू झाला. यावेळेच विजूने आपल्या मुलीला जन्म दिला. या हल्ला दिवशी मुलगी जन्माला आल्यामुळे चौहान कुटुंबियांनी मुलीचे नाव ‘गोळी’ असे ठेवले. गोलीचे खरे नाव तेजस्विनी आहे. पण पण तिला ‘गोळी’ या नावानेच सर्वजण ओळखतात.

निर्मला पोन्नुदुराई

निर्मला पोन्नुदुराई या त्यांच्या लग्नाकरिता जात होत्या. तेव्हा दोन दहशतवाद्यांनी मुंबईच्या मुख्य स्टेशनवर (सीएसएमटीवर) अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये ५२ लोक ठार झाले. ही सर्व घटना निर्मला पोन्नुदुराई यांच्या डोळ्या देखत घडली. निर्मला पोन्नुदुराई या घटनेबाबत बोलतात की, ‘असे वाटते की हे कालच घडले आहे. त्यावेळेस मला फडाके फोडल्यासारखा आवाज वाटला. माझ्या चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. सर्व परिसरात धूर झाला होता. डोकं सून्न झाले होते. एक व्यक्तीने मला लाकडी गाडीवर बसवले आणि मला दवाखान्यात नेले. माझे लग्न ठरलेल्या दिवशी व्हावे असे मला वाटत होते. म्हणून मी चेन्नईला गेले. ३० नोव्हेंबरला माझे लग्न झाले. त्यानंतर डोक्यातील गोळी काढण्यासाठी ऑपरेशन झाले. ज्यानंतर तीन महिन्यांपर्यंत माझ्या चेहरा लकव्याचा शिकार झाला होता.’

सौरभ मिश्रा

२६ नोव्हेंबरला सौरभ मिश्रा आपल्या मित्रासोबत लिओपोल्ड कॅफेमध्ये बिअर पिण्यासाठी गेले होते. तेव्हा दोन दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून गोळीबाराला सुरुवात केली. यामध्ये परदेशी लोकांसह १० जण मृत्यूमुखी पडले. याबाबत सौरभ मिश्रा म्हणाले की, ‘मी गोळ्यांचा आवाज ऐकत होतो. त्यानंतर मला गोळी लागल्याचे कळाले. त्यावेळेस लोक टेबलच्या खाली घुसत होते आणि मी बाहेर रस्त्यावर आलो. मग टॅक्सीतून रुग्णालयात जात असताना मी जिवंत राहणार नाही असे वाटत होते.’ गोळीने त्यांच्या फुफ्फुसला स्पर्श केला होता पण त्यामुळे काही नुकसान झाले नाही. ऑपरेशन करून लगेच ती गोळी काढली. रुग्णालयात सर्वत्र मृतदेह होते आणि मृत्यूमुखी पडलेल्या यादी त्यांचे नाव टाकले होते. एवढेच नाही तर एका टीव्ही चॅनलेचे पत्रकार त्यांच्या आई-वडिलांची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले होते.

सोनाली खरे

मुंबईतल्या या दहशतवादी हल्ला दिवशी अभिनेत्री सोनाली खरे रात्री पती बिजय आनंदसोबत ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. रात्री ९च्या सुमारास ते दोघेजण हॉटेलमध्ये पोहोचले आणि पाच मिनिटाच गोळीबारचा आवाज यायला सुरुवात झाली. यानंतर सर्वजण ओरडू लागले. शेवटच्या टेबलवर बसल्यामुळे सोनाली अक्षरशः दबली होती. सोनाली आणि तिचा नवरा कसेबसे जीव वाचवून तेथून निघाले. त्यानंतर ते ५० जणांसह किचनमध्ये बसून राहिले. संपूर्ण रात्र सोनालीने हॉटेलमध्ये बसून काढली आणि सकाळी ६ वाजता सोनाली आणि तिथेल इतर लोक बाहेर पडले. सोनालीला आजही फटाक्यांच्या आवाज ऐकला तरी तिचा थरकाप उडतो, असे तिने सांगितले होते.

देविका रोतवान

देविका रोतवान त्यादिवशी आपल्या कुटुंबासोबत पुण्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्टेशनला गेली होती. त्यावेळेस तिच्या भावाला बाथरुम जायचे होते. म्हणून तो बाथरुमला गेला. मग ती आणि तिचे वडील तिकीट काढण्यासाठी जात होते त्यावेळेसच बॉम्बस्फोट झाला आणि गोळीबारला सुरुवात झाली. आम्ही पळायचा प्रयत्न केला तेव्हा कसाबची गोळी देविकाच्या पायाला लागली. ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली. मग तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात येण्यात आले. जे.जे रुग्णालयात सहा वेळा पायाचे ऑपरेशन करण्यात आले. मग त्यानंतर १० जूनला देविकाने कोर्टात जाऊन कसाब विरोधात जाब दिला. तिला ‘२६/११ कसाब’ नावाने ओळखले जाते.

First Published on: November 26, 2020 6:00 AM
Exit mobile version