मार्गशीर्षमुळे फुलांचे भाव वधारले

मार्गशीर्षमुळे फुलांचे भाव वधारले

मार्गशीर्षमुळे फुलांचे भाव गडगडले

सण तोंडावर आला की, सर्व किंमतीमध्ये वाढ होते हे काही नवीन नाही. त्यातच मार्गशीर्ष महिना म्हटल का फळांपासून ते फुलांपर्यंत सर्वांचे भाव गगनाला भिडतात. दररोज मिळणाऱ्या फळांच्या आणि फुलांच्या किंमतीत वाढ होते. नुकतीच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे फुलांच्या किंमती वाढल्या आहेत. ऐन मार्गशीर्षमध्ये फुलांच्या किंमतीत जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. दुष्काळाच्या परिणामांमुळे फुलांची आवक घटल्याने किंमती वधारल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

झेंडू ८० रुपये किलो

मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. अनेक बाजार फळा, फुलांनी भरलेले दिसून येत आहे. मात्र फुलांच्या बाजारात फुलांच्या किंमती वाढलेल्या असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांचे उत्पादन कमी झाले असून, सध्या घाऊक बाजारातील त्यांची आवकही घटली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या किंमतीत दुपटीने वाढल्या आहेत. घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात ३० ते ४० रुपये किलोने विकला जाणार झेंडू या आठवड्यात ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. तर अष्टरची जुडी १० रुपये झाली आहे.

या ठिकाणी होते फुलांची शेती

पुणे, नाशिक आणि अहमदनगर या भागात फुलांची शेती अधिक प्रमाणात होते. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा येथील फुलांचे उत्पन्न निम्म्याहून कमी झाले आहे. त्यातच मार्गशीर्ष महिन्यात महिलांकडून फुलांना अधिक मागणी असते. या महिन्यात पंचांगात विशेष महत्त्व असल्याने अनेक शुभकार्ये नागरिकांकडून केली जातात. शिवाय या महिन्यात दत्त जयंती असते. त्यामुळे फुलांची मागणी जास्तच वाढत असल्याने फुलांचे भाव देखी वाढले आहेत.

फुलांचे आजचे भाव

गोंडा : घाऊक – ७० ते ८०; किरकोळ – १०० ते १२०
शेवंती : घाऊक ८० ते १००; किरकोळ – १२० ते १४०
तगर : घाऊक ३०० ते ३२०; किरकोळ – ४०० ते ४६०
मोगरा : घाऊक ४०० ते ५००; किरकोळ – ५०० ते ६००
लहान गोंडा : घाऊक ७० ते ८०; किरकोळ – १०० ते १२०
गुलछडी : घाऊक ८० ते १००; किरकोळ – १०० ते १२०
अष्टर : घाऊक ८ ते १०; किरकोळ – १८ ते २०

फुलांचे मागील आठवड्यातील भाव

गोंडा : घाऊक – ३० ते ४०; किरकोळ – ५० ते ६०
शेवंती : घाऊक ४० ते ५०; किरकोळ – ६० ते ८०
तगर : घाऊक १०० ते १२०; किरकोळ – १४० ते २००
मोगरा : घाऊक २०० ते ३००; किरकोळ – ३०० ते ४००
लहान गोंडा : घाऊक ३० ते ४०; किरकोळ – ६० ते ८०
गुलछडी : घाऊक ४० ते ६०; किरकोळ – ६० ते ८०
अष्टर : घाऊक ४ ते ५; किरकोळ – ८ ते १०

First Published on: December 12, 2018 10:59 AM
Exit mobile version