2 कोटींच्या विदेशी सिगारेट जप्त

मुंबईत महसूल विभागाने छापा मारून तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा विदेशी सिगरेटचा अवैध साठा जप्त केला. या वेळी दोन जणांनाही अटक करण्यात आली. डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सिगारेट तस्करी करणारी ही टोळी दिल्लीची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या वेळी विदेशी बनावटीच्या ७ लाख ३२ हजार ६४०सिगारेटही जप्त करण्यात आल्या आहेत. या सिगारेटची किंमत १ कोटी ७ लाखांच्या घरात आहे. मार्लब्रो, मोअर, गुनांग गरम, रॉथमन्स या सह इतर ब्राँड्सचा यात समावेश आहे. मुंबईत या सिगारेट येत असत इथून त्यांची तस्करी चालते, अशी अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. मुसाफिरखाना भागात असलेल्या गोदामावर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

First Published on: August 22, 2018 4:30 AM
Exit mobile version